Prabhu Ramane Darshan Dyave Lyrics

Song: Prabhu Ramane Darshan Dyave
Singer: Prathmesh lagate
Music: K Pandurang seetaram lagate
Lyrics: Unknown

Prabhu Ramane Darshan Dyave Lyrics

प्रभू रामाने दर्शन द्यावे
गातो मुखी हरिनाम
अंतरी माझ्या रात्रंदिन तो
वास करिल श्रीराम || धृ ||

विलसे हाती धनुष्यबाण
जवळी सीता आणि लक्ष्मण
जोडुनी कर द्वय मारुती लीन
असा दिसो मज राम
अंतरी माझ्या रात्रंदिन तो
वास करिल श्रीराम.. || १ ||

शब्द पित्याचे आज्ञा मानून
कर्तव्याचे कठोर पालन
आदर्श संसारी हे रामायण
विनये करितो प्रणाम
अंतरी माझ्या रात्रंदिन तो
वास करिल श्रीराम.. || २ ||

You may also like...