Premachi Goshta Serial Title Song Lyrics In Marathi

Song: Premachi Goshta Serial Title Track
Singer: Sugandha Datye & Abhishek Telang
Music: Nilesh Moharir
Lyrics: Shripad Joshi

Premachi Goshta Serial Title Song Lyrics In Marathi

जरी दुरावते
जवळ येऊनी
तरी मनास ह्या
आस ही लागे

खुणावतो तुझा
नवीन स्पर्श हा
उगा उरात ह्या
रात ही जागे

फिरुन गुंततो
कुणात जीव हा
ऋ्तु नवा हवा
सुखास आज ह्या

जशी उधाणते
हर एक लाट ही
तशीच घेरते
ही अबोल प्रीत

जरा खुलेल ही
जरा फुलेल ही
तुझ्या माझ्या
प्रेमाची गोष्ट

नकळत उलगडे
अशी मनातुनी
तुझ्या माझ्या
प्रेमाची गोष्ट

सरीत चिंब हा
भिजून कोरडा
जीव एकटा
भांबावला

जरी समोरची
कठीण वाट ही
मिळेल साथ का
तुझी मला

मनास सांगतो
तरी पडे पुन्हा
मनास स्वप्न हे
अजाणता आता

मिटून अंतरे
पुसून या खुणा
जगावेगळी
आपुलीच भेट

कुणा कळेल ही
कुणा पटेल ही
तुझ्या माझ्या
प्रेमाची गोष्ट

You may also like...